नवी दिल्ली, वृत्तसेवा । गलवान खोऱ्यात चीनने केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता. चीनचे ही योजना पूर्वनियोजित असतांना केंद्रातील सरकार मात्र गाढ झोपेत होते आणि आता हे सर्व ते नाकारत आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याची किंमत आमच्या शहीद जवानांना चुकवावी लागली, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार निष्काळजीणे वागल्याचे सूचित केले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यातील घटनेवरून ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विट करत केंद्रावर टीका करत आहेत. कालही त्यांनी आपला एक व्हिडिओ ट्विट केला होता. निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल करतानाच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली अशी विचारणा राहुल गांधी यांनी या व्हिडिओद्वारे त्यांनी केली होती.