सावदा, प्रतिनिधी। कोरोना या जीवघेण्या रोगाच्या पार्श्वभूमीवर येथील श्रीराम मंदिरात केवळ ४ जणांच्या उपस्थितीत रामजन्मोसव साजरा करण्यात आला.
चिनावल येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने रामजन्मोसव ,रामपालखी मिरवणूक ,सहीभाले मिरवणूक ,गावयात्रा असा भव्य सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो. मात्र यंदा कोरोना रोगामुळे पोलिस प्रशासनाने मंदिर प्रशासनास दिलेल्या नोटीस नूसार फक्त पूजारी व अन्य २ जणांनी आरती व पूजाअर्चा करून थोडक्यात सोहळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. भाविकांनी आरोग्याच्या दृष्टीनेमंदिर बंद करण्यात आले. यंदा प्रथमच भाविकाविना राम जन्मोत्सव साजरा झाला.