सावदा ता. रावेर, प्रतिनिधी। येथील ग्रामपंचायत मार्फत येथील आरोग्य कर्मचारी तसेच आशा वर्कर यांना सॅनिटायझर किटचे वाटप आज ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी सरपंच भावना योगेश बोरोले , उपसरपंच व सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर हे काम करीत आहेत. त्यांना आज सरपंच भावना बोरोले , पोलीस पाटील निलेश नेमाडे , सर्व सदस्यांनी सॅनिटायझर किटचे वाटप केले. यावेळी चिनावल प्राथमिक आरोगय केद्राचे कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. सॅनिटायझर किटचा वापर करून गावात कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी जनजागृती करण्याचे आवाहन उपस्थितांमार्फत करण्यात आले. तसेच यावेळी डॉ. ठाकूर, तलाठी उमेश बाबूळकर हे उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क व गोल्ज ही देण्यात आले.