Home राजकीय चिनावल ग्रामपंचायत सदस्या तब्बसुमबी शेख अपात्र

चिनावल ग्रामपंचायत सदस्या तब्बसुमबी शेख अपात्र

0
43

सावदा, प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या चिनावल गावाच्या वार्ड क्र ४ च्या ग्रा.प.सदस्या तब्बसुमबी शे.अजमल या ३ अपत्य कारणाने अपात्र ठरल्या आहेत.

ग्रामपंचायत विवाद क्र ४४/ २० नूसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ ( ज.१ ) नूसार विवाद अर्ज दाखल होता. त्या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होवून सामनेवाले तब्बसुमबी शे.अजमल यांना दि १२/ ९/ २००१ नंतर ३ रे अपत्य झाले असल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांना या पुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून या पुढे राहता येणार नाही असा आदेश नुकताच उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी दिला आहे. याबाबत विवाद अर्जदार परेश मुकुंदा महाजन व ग्रामपंचायत प्रशासनास त्यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound