भुसावळ, प्रतिनिधी । ISRA पुरस्कृत सोशालिस्ट रिपब्लिकन चित्रपट कलाकार/कामगार असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य उप सचिवपदी प्रेम तायडे यांची निवड करण्यात आली आहे.
भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील प्रेम तायडे यांची सोशालिस्ट रिपब्लिकन चित्रपट कलाकार/कामगार असोसिएशनच्या महाराष्ट्र उप सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती चित्रपट कलाकार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन शिरसाठ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळू वाघ व राज्य सचिव शरद बावस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. त्या वेळी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व उपस्थित असलेले सर्व कलाकार यांच्या कडून प्रेम तायडे यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.