चितोडा येथे ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली मोफत ई-श्रम कार्ड वितरण अभियान दाहाव्या टप्प्यात पोहोचले असून या उपक्रमाला चितोडा गावातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

यावल तालुक्यातील चितोडा गावातील नागरीकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा तात्काळ लाभ मिळावा, याकरीता ग्रामीण क्षेत्रातील राहणाऱ्या श्रमजिवी कुटुंबास अत्यावश्यक असणारे ई-श्रम कार्डची मोफत नोंदणीचे अभियानास दहावे सत्राला सुरुवात करण्यात आली. या अभियानास चितोडा ग्रामपंचायत जवळ आयोजीत करण्यात आलेल्या या मोफत ई =श्नम कार्ड नोंदणी अभियानाच्या माध्यमातुन एकूण ३४६ लाभार्थ्यांनी यात लाभ घेतला. यावेळी मोफत ई -श्रम कार्ड अभियानाचे उद्घाटन या महाअभियानाचे मुख्य आयोजक डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सलिमा तडवी, उपसरपंच भावना धांडे, अतुल पाटील, डिंगाबर महाजन, दिनेश कुरकुरे, राजू धांडे, राजू कुरकुरे, तुकाराम पाटील, विजय पाटील, विलास धांडे, सलीम तडवी, दिनेश धांडे, बेबी पाटील, जोती पाटील, मनोज टोंगाडे, मनोज पाटील, निखिल पाटील, सचिन पाटील, ऋषिकेश पाटील, निखिल पाटील, स्वप्नील धांडे, तुषार पाटील, प्रफुल पाटील, दिपक भंगाळे, ओम पाटील, आदींची उपस्थिती होती. अभियान यशस्वीतेसाठी सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, हर्षवर्धन मोरे, अक्षय राजपूत, चेतन कापुरे, शुभम सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content