चिकाटीने कठोर परिश्रम करा, यश नक्की मिळेल – असिम किफायत खान

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे पाचोरा टिचर्स असोसिएशन व शिक्षक सेना पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका समारंभ मध्ये असीम खान बोलत होते.

आसिम खान किफायत खान यांनी यू. पी. एस. सी. ५५८ रँक प्राप्त करून आयपीएसची पद प्राप्त करून ट्रेनिंग घेत आहे. आसिम खान हे मूळ धरणगाव चे रहिवासी असून आता धुळे जिल्ह्यात साकरी तालुक्याचे लहान गाव निजामपूर येथे राहतात. त्यांनी आपले शिक्षण उर्दू माध्यमातून पूर्ण केले. त्यांनी यू.पी.एस.सी. ची तयारी उर्दू माध्यम मध्ये करून, उर्दू माध्यम मध्ये सर्व पेपर लिहून यश मिळवण्याचा मान पटकावलेला आहे.

यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांचे स्पर्धा परीक्षा ची तयारी संदर्भात मार्गदर्शन केले. सतत परिश्रम करून तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्ही आपल्याशी वचनबद्ध रहा, संयम आणि चिकाटीने अभ्यास करा. यश मिळणे नक्की आहे. कार्यक्रमाचे उद्दिष्ट उपशिक्षक शेख जावेद रहीम यांनी प्रस्तुत केले.

कार्यक्रम मध्ये पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, रिटायर्ड जुडीशियल मेजिस्ट्रेट अजहर खान (मुंबई), शिक्षक सेना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, सतीश पाटील, विजय ठाकूर, कदिरशब्बीर, मुख्याध्यापक अब्दुल एजाज अब्दुल रऊफ व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साबीर मुस्तफा आबादी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रायोजक अजहर लूकमान खान (मोती वाला), अय्युब बागवान, हाजी नाजिम, सईद शेख, अबुलैस सेठ होते. कार्यक्रमाल यशस्वीतेसाठी टिचर्स असोसिएशन पाचोरा चे रेहान खान, मुख्याध्यापक शोएब सर, अजहर खान, आकिब युसुफ, केंद्रप्रमुख मेहमूद सर, मुख्याध्यापक मुख्तार पिंजारी, सलमान शौकत, मोमीन फैसल, मुबिन मुलकोद्दिन, इस्माईल सुलेमान, सय्यद जाफर, जावेद मजीद, शाहीन मॅडम, सुमय्या देशमुख, अब्दुल बारी, आसिफ जलिल, सलाउद्दिन सर, नगमा फतेमा, रईस सबहान खान, कदिर शब्बीर, शेख जावेद रहीम, फहीम कुरैशी, साजिद कुरैशी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content