सावदा, ता. रावेर । शहरात दोन दिवसांपुर्वी पहिला कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या ५५ वर्षीय महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी यांनी दुजोरा दिला आहे.
दोन दिवसांपर्यंत सावदा शहरात कोरोना रूग्ण नव्हते. गेल्या दोन दिवसात दोन रूग्ण आढळून आले आहे. सावद्यात कोरोनाबाधित पहिला रूग्ण १८ मे रोजी आढळून आला होता. तर १९ रोजी गावातीलच एका पुरूषाचा अहवाला पॉझिटीव्ह आला. दोन्हा कारोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील एकुण ३९ जणांना क्वारंटाइन करण्यात आले असून सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान मयत झालेल्या महिलेचा वास्तव्य असणार्या परिसरात फवारणीचे काम सुरू असून हा परिसर सील करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याचा वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.