सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतून आज तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सांगलीत आता कोरोनाग्रस्तांची संख्या २३ झालीय. दरम्यान, कोरोनाग्रस्त सर्व २३ जण एकाच कुटुंबातील असल्यामुळे सांगलीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
नव्या रुग्णांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. तर पुण्यातून एक चांगली बातमी आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबई वरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित १२रुग्ण होते, त्यातल्या तीन जणांना आता घरी सोडण्यात आले आहे. त्याचवेळी एकही नवा रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्यातील बाधितांचा आकडा १४७ च्या घरात गेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे. याला सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे.