मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावात एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या ही ११६ वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १३० झाली आहे.
मालेगावात पहिले ५ रुग्ण ८ एप्रिला आढळले होते. पण आज २४ एप्रिल रोजी मालेगावात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. मालेगावमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. येथील सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. परंतू मालेगावात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने मालेगावची डेंजर स्पॉटकडे वाटचाल होत असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.