मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत एका ५६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालाय.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात हा आकडा ६४ वर पोहचलाय. राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता ७४ वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात ३१५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या ६४ होती, मात्र आज ही संख्या ७४ वर पोहोचली आहे. दरम्यान, दरम्यान, आजच्या ‘जनता कर्फ्यू’ला देशातील उस्फुर्त प्रतिसाद दिलाय.