मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात आत्तापर्यंत आणखी ८२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजार ६४ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
रविवारी राज्यात १९८२ रुग्ण होते. त्यात आता ८२ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा २०६४ झाला आहे. गेल्या १२ तासांत मुंबईत ५९, मालेगावमध्ये १२, ठाण्यात ५, पुण्यात ३, पालघरमध्ये दोन आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड, नागपूर, यवतमाळ, जळगाव, औरंगाबादमध्ये गेल्या १२ तासांत एकही रुग्ण सापडलेला नाही. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1357 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. खबरदारीचे सगळे उपाय योजण्यात आले आहेत. महाराष्ट्रात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनही आखण्यात आले आले आहेत.