चिंताजनक : धरणगाव तालुक्यात आज सापडले १३ कोरोना पॉझिटिव्ह !

 

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव कोवीड केअर सेंटरला रविवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात धरणगाव शहर, उखळवाडी, पथराड, भोणे बुद्रुक, आनोरे,साळवा,पिंप्री खुर्द, कल्याणेखुर्द येथील रुग्णांचा समावेश आहे.

 

 

धरणगाव कोवीड केअर सेंटरला रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात त्यात धरणगाव शहर-१, उखळवाडी-२, पथराड-२, भोणे बुद्रुक-१, आनोरे-१,साळवा-२,पिंप्री खुर्द-३, कल्याणेखुर्द-१ असे एकूण १३ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील एकुण रूग्ण संख्या आता ३४५ झाली आहे. तर साधारण १०४ रुग्ण कोविड सेंटरला उपचार घेत आहेत. तसेच आतापर्यंत साधारण २२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर २१ जण मयत झाले आहेत. दुसरीकडे बालकवी ठोंबरे विद्यालय, कोविड सेंटर आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये संशयिताना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.

Protected Content