चिंताजनक : देशभरात गेल्या चार दिवसांत ९०० जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या चार दिवसांत देशभरात ९११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे.

 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे. कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १००० जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहोचली आहे. भारतात १२ मार्च रोजी पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे.

Protected Content