Home आरोग्य चिंताजनक : जिल्ह्यात नव्याने २७० कोराना रूग्णांची भर; १४ रूग्ण झाले बरे...

चिंताजनक : जिल्ह्यात नव्याने २७० कोराना रूग्णांची भर; १४ रूग्ण झाले बरे !

0
41


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर आणि भुसावळ तालुक्यात कोरोना रूग्ण अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. तर १४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

 

जळगाव शहर- ६६, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३७, अमळनेर-०, चोपडा-८, पाचोरा-१०, भडगाव-१, धरणगाव-३, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-४, पारोळा-१, चाळीसगाव-१३, मुक्ताईनगर-१४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण २७० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार १६२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात १४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २ हजार ५८० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २८८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound