Home आरोग्य चिंताजनक : गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार ९०३ कोरोनाबाधित

चिंताजनक : गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार ९०३ कोरोनाबाधित



नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
देशात गेल्या २४ तासांमध्ये देशात २० हजार ९०३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३७९ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी (३ जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०,९०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६ लाख २५ हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १८ हजारांवर पोहोचला आहे. तर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सहा लाख २५ हजार ५४४ इतकी झाली आहे. दोन लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १८ हजार २१३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.


Protected Content

Play sound