हाँगकाँग (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. परंतू हाँगकाँगमध्ये एका पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. माणसांनंतर प्राण्यांमध्ये कोरोना झाल्याचे समोर उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
हाँगकाँगमध्ये एका महिलेला कोरोना झाला. त्यामुळे तिच्या कुत्र्यालाही कोरोना झाला. या कुत्र्याला तेथील एका पशू केंद्रात वेगळ ठेवले जात आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ही घटना समोर आल्यानंतर हाँगकाँगमध्ये कुत्र्यानाही वेगळे ठेवले जात आहे. पामेरियन ब्रिडच्या सर्व कुत्र्यांची सतत तपासणी केली जात आहे. या कुत्र्यांची तपासणी झाल्यानंतर निगेटिव्ह रिझल्ट आल्यास त्यांना त्यांच्या मालकांकडे सोपवले जाईल. हाँगकाँगमध्ये आतापर्यंत १०४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.