नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात मागील २४ तासात आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्येची नोंद झाली. देशात पहिल्यांदाच ६२ हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
देशभरात २४ तासात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा २० लाख २७ हजार ०७४ वर पोहोचला आहे. बुधवारी ५६ हजार २८२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे २४ तासांत ९०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ५० हजारांच्या सरासरीने वाढत आहे. या प्रचंड रुग्णवाढीमुळे देशातील रुग्णसंख्या १५ लाखांवरून २० लाख होण्यासाठी केवळ नऊ लागले आहेत. १८ मे ते २६ जून या काळात देशात तब्बल चार लाख रुग्णांची भर पडली. १६ जुलै रोजी देशातील रुग्णसंख्या १० लाखांवर पोहोचली. ५ लाखांवरून १० लाख रुग्णसंख्या होण्यासाठी फक्त २० दिवस लागले.