रोम (वृत्तसंस्था) इटलीमध्ये कोरोनाने अक्षरश: थैमान घातलाय. याठिकाणी एकाच दिवसात ४७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीतील मृतांची संख्या २,९७८ झाली.
कोरोनाने जगभरात जवळपास दोन लाखांहून अधिक लोक संक्रमित आहेत आणि जवळपास ८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे इटलीत याचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. याठिकाणी मागील २४ तासांत ४,२०७ नवे रूग्ण समोर आले आहेत. यामुळे एकूण रूग्णांची संख्या ३५,७१३ वर पोहोचली आहे. चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या जवळपास ३३०० आहे. संपूर्ण यूरोपमध्ये ८० हजारहून अधिक लोक कोरोनाचे संशयित आहेत. यूरोपमध्ये मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. भारतात कोरोनाची आतापर्यंत जवळपास १५० हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.