यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या तीन महिन्यांपासून तालुक्यातील चिंचोली- डांभुर्णी शेत शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
तालुक्यातील उंटावद, चिंचोली, डोणगाव व डांभुर्णी शेतशिवारात गेल्या तीन महिन्यांपासून केबलवायरी चोरणाऱ्या चोरट्यांनी परिसरात धुमाकुळ घातला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच आता खरीप पूर्व कामांसह पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवस रात्र शेतात काबाड कष्ट करत आहे. परंतु या केबलचोरांनमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे पेरणीपुर्व शेती तयार करण्यासाठी व बियाणे खरेदीसाठी शेतकरी पैशांची जमवाजमव करीत असतांना शेतीपंपाच्या केबल वायरींची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधीकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. या केबल वायरींनमध्ये असलेल्या तांब्याचा तारा काढून हे केबलचोर विकतात. मात्र शेतकऱ्याला २ ते ३ हजार रूपयांचा भुर्दड बसतो व नवीन वायर येईपर्यंत पिकांना पाणी देता येत नाही व त्यामुळे उत्पन्न कमी होते. मागील ३ महीण्यात ३ वेळा केबल वायारी चोरीस गेल्या आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांनपुर्वी शेतीची विज रात्री ११ वाजता आली व ११.३० ते १२.३० या वेळातच या केबलचोरांनी कोणतीही भिती न बाळगता उंटावद येथील १५ ते २० शेतकऱ्यांच्या केबल वायरी चोरून नेल्या. यावरून केबलचोर शेतात विजपुरवठा सुरू असतांनाही बिनधास्तपणे वायरी कापून चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे . यामुळे या केबल चोरांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी या परीसरात रात्रीची गस्त वाढवावी जेणेकरून या चोरीच्या सतत होणाऱ्या घटना थांबतील अशी मागणी परीसरातील असंख्य शेतकरी वर्गाकडुन करण्यात येत आहे.