मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे गरजू लाभार्थी व नागरिकांना वेळेवर मिळन नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुक्ताईनगर गटविकास अधिकारी यांच्याकडे काँग्रेसच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द गावात असलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच हे गरजू लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये मिळणाऱ्या शासकीय लाभासाठी लागणारे कागदपत्र यात उतारा, कुटुंब पत्रक, रहिवासी दाखले हे मिळत नसल्यामुळे त्यांना वेळोवेळी दाखला देण्यास टाळाटाळ करत आहे. तसेच उडवा उडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार नरेश शालिग्राम खंडागळे यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार झाले निवेदन दिले आहे. दरम्यान गरजूंना जाणून- बुजून हेतू पुरस्कार वरील कागदपत्रे देण्यास नाकार देत आहेत. शिवाय जातिवाद व पक्षपात करून गावातील राजकीय व श्रीमंत व्यक्तींची नावे सांगून विचारल्याशिवाय कागदपत्रे देता येणार नाही असे सांगितले जाते. दरम्यान याची संपूर्ण चौकशी करून संबंधित गरजू लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश खंडागळे यांची स्वाक्षरी आहे.