चाळीसगाव शहरात संचारबंदीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद (व्हिडीओ)

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांसाठी शहरात संचारबंदी लागू केली आहे. परिणामी आज पहिल्याच दिवशी चाळीसगावातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वत्र सुकसुकाट दिसून आला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी चाळीसगाव सज्ज असल्याचे चित्र आज दिसून आले.

चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दि. १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू केले आहे. चाळीसगाव नगरपालिका हद्दीत हे नियम लागू असून आज पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. अशी जणभावना आजचे चित्र बघून नागरिकांत दिसून येत आहे. दरम्यान नियमांचे पायमल्ली व विनामास्क धारकांना पोलिसांकडून चांगलीच चपराक दिली जात आहे. येथील सिग्नल चौक, घाट रोड, धुळे रोड, भडगाव रोड, स्टेशन रोड आदी ठिकाणी सुकसुकाट दिसून आला. वैद्यकीय सेवा वगळता शहरात सर्व बंद ठेवण्यात आले. ठिकठिकाणी पोलिसांच्या बंदोबस्तीमुळे काटेकोरपणे पालन होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी उमटविली.

https://www.facebook.com/508992935887325/videos/212426467291532

 

Protected Content