चाळीसगाव, प्रतिनिधी | बंजारा समाजासह विविध समाजातील घटकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शहरातील ग्रायत्री प्लाझा येथे बंजारा समाज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्राणी मित्र इंदल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने आहेत. त्यांना विविध कामांसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे बंजारा समाजासह विविध समाजातील घटकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी चाळीसगाव शहरातील ग्रायत्री प्लाझा येथे बंजारा समाज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्राणी मित्र इंदल चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. दरम्यान उद्घाटनप्रसंगी संत सेवलाल महाराज व स्व. वसंतरवजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयघोष घालण्यात आले. दरम्यान जुन्या अनिष्ट रूढी परंपरा जोपासत समाज अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. देवी देवतांच्या नावाने यात्रेत बोकडबळी प्रथा संपुष्टात यावी अशी अपेक्षा प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी सांगितले. तर संपर्क कार्यालयामुळे समाज बांधवांना मोठा आधार मिळणार असल्याचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प. काशिनाथ माऊली यांनी सांगितले. दरम्यान सदर कार्यालय हे फक्त बंजारा समाजासाठीच नसून सर्व बहुजन अठरापगड भटक्या विमुक्त बहुजन समाजाचे कार्यालय असणार आहे. कुठल्याही जाती धर्माचा शोषित वंचित व्यक्ती आपली समस्या घेऊन आला तर ती समस्या सोडविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल, अन्याय अत्याचार, विरोधात प्रखरपणे लढून न्याय हक्कासाठी लढण्याचे हे कार्यालय असेल असे प्रतिपादन शेतकरी बचाव कृती समितीचे युवा नेतृत्व भिमराव जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र नायक, ह. भ.प. काशिनाथ माउली , ह. भ. प. कांतिलाल राठोड , चत्रू राठोड, ॲड. हिरालाल पवार, उत्तम जाधव, ॲड. वाडीलाल चव्हाण, ॲड. भरत चव्हाण, सुदाम चव्हाण, अनिल राठोड, योगेश्वर राठोड, भिमराव जाधव, प्रकाश राठोड, जयलाल चव्हाण, गंगाराम राठोड, सनिल जाधव ( अभियंता ) संजय राठोड, प्रशांत पवार, आदी उपस्थित होते.