चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील कमलदिप प्लाझा कॉम्प्लेक्स येथून एका तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना आज उघडकीला आली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दिलीप भास्कर हारगुडे (वय- ३९ रा. हातले ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून हातमजुरी करून ते कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. मात्र १९ जून रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास हारगुडे हे शहरातील धुळे रोडवरील कमलदिप प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कामासाठी आले होते. कामावर जाण्यापूर्वी त्यांनी कॉम्प्लेक्स समोर हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.१९ एजे- ५९९४) उभी करून नंतर कामावर निघून गेला. परंतु हारगुडे हा काम आटोपल्यानंतर मुळ जागी परतल्यावर त्याला मोटारसायकल दिसून आली नाही. त्यावर त्यांनी लागलीच बस स्थानक, रेल्वे स्थानक, भडगाव रोड, धुळे रोड आदी ठिकाणी शोधाशोध केली असता दुचाकी मिळून आले नाही. त्यामुळे १५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची खात्री झाल्याने शहर पोलिस स्थानक गाठून त्यांनी भादवी कलम- ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहेत. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.