चाळीसगाव वाहतूक शाखेच्या दोघांना पदोन्नती!

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार चाळीसगाव वाहतूक शाखेच्या दोन कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या  कर्मचाऱ्यांचे वाहतूक शाखेच्या कार्यालयात पोलिस निरीक्षक यांनी  पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी नुकतीच जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलिसांच्या  बढतीचे निर्देश दिले आहे. त्यात चाळीसगाव वाहतूक शाखेतील  दोन जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. हवालदार अरूण बाविस्कर यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक तर पोलिस नाईक  प्रदिप अहिरे यांना  पोलिस हवालदार या पदावर बढती देण्यात आली आहे. चाळीसगाव वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी  पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. कोरोना नियमांचे पालन करून यावेळी सत्कार करण्यात आले.

Protected Content