चाळीसगाव प्रतिनिधी । येथील तालुका वकील संघाची नूतन कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली.
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. डी. एन. बोराडे, अॅड. ए. बी. मोरे आणि अॅड. एस. व्ही. नानकर यांनी कामकाज बघितले. सर्वसंमतीने ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी अॅड. पुष्कर प्रकाश कुलकणी, उपाध्यक्ष अॅड. मनोज युवराज पाटील, सचिव अॅड. गौतम ईश्वर जाधव, सहसचिव, अॅड. वैशाली शंकर कांदळकर आणि खजिनदार अॅड. योगिता डी. निकुंभ यांची निवड जाहीर झाली. नवनियुक्त कार्यकरिणीचे स्वागत करण्यात येत आहे.