जळगाव प्रतिनिधी । घरगुती विज कनेक्शन मिळविण्यासाठी चाळीसगाव येथील पंटरसह वायरमनला नाशिक येथील एसीबीने पाच हजार रूपयाची रोख रक्कम घेतांना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवाशी असून महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीत घरगुती कनेक्शन मिळाविण्यासाठी ऑनलाईन अर्जावरून कोटेशन काढून देण्याकरीता वायरमन संदीप हरी मुंडे (वय-३४)रा. मु.पो. वासाडी ता. कन्नड जि.जळगाव याने पाच हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याप्रकरणी नाशिक एसीबीला तक्रार दिली. नाशिक येथील पथकाने आज सापळा रचून वायरमनचा पंटर अजय संयज पाटील (वय-२९) रा. मु.पो.करगाव ता.चाळीसगाव याला तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रूपये रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
नाशिक एसीबी विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.वैभव देशमुख, पो.ना.नितीन कराडे, चालक संतोष गांगुर्डे यांनी कारवाई केली आहे.