चाळीसगाव प्रतिनिधी । महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावे या उद्देशाने मानवाधिकार सुरक्षा संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असताना रविवार रोजी मोफत केक प्रशिक्षणाचे आयोजन शहरातील कैलास नगर येथे करण्यात आले.
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे या दुष्टीकोनातून मानवाधिकार सुरक्षा संघाकडून भिन्नभिन्न उपक्रम राबविण्यात येते. १३ जून रोजी मानवाधिकार सुरक्षा संघाच्या महिला आघाडीकडून एक तासांचा मोफत केक प्रशिक्षणाचे आयोजन शहरातील भडगाव रोड, कैलास नगर येथे घेण्यात आले. मानवाधिकार सुरक्षा संघ चिप प्रमोटर विवेक ओबेरॉय, चेअरमन हरित हरिश्चंद्रा, राष्ट्रीय सचिव वासुदेव कुलकर्णी, महिला प्रदेशाध्यक्ष भावना थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला ह्या प्रामुख्याने स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. मानवाधिकार संघटनेकडून रश्मी लोडाया, मणिषा पाटील, स्मिता पाटील, कविता जाधव, सविता सोनवणे, ममता देसले व सोनी राणी आदींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात गौरी वेदांत, प्रियंका लोडया, सोनी मराठे, कविता पाटील, सविता पाटील, ऋतू माने व राखी मायने आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.