चाळीसगाव येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता

चाळीसगाव प्रतिनिधी । कामावर जात असल्याचे सांगून २५ वर्षीय तरूण तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अजय मोतीलाल मोरे (वय-२५) रा. हरीओमनगर , जुनापॉवर हाऊस रोड, चाळीसगाव येथे आई-वडील व भाऊसह वास्तव्यास होता. बाहेर गावी लग्न समारंभात कामावर जात आहे. म्हणून १९ जानेवारी रोजी कामाच्या निमित्ताने बाहेर गावी गेला. परंतु अध्यापपर्यंत तो घरी न परतल्यामुळे आई मायामती मोतीराम मोरे (वय-४०) हिने दिलेल्या फिर्यादीत माझा मुलगा अजय मोरे हा दि.१९ जानेवारी रोजी लग्न समारंभात कामावर जात असल्याचे सांगून परत न आल्याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रंग- सावळा असून उंची ५ फूट ५ इंच आहे. त्याने पांढरा शुभ्र शर्ट परिधान केला आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भगवान उमाळे हे करीत आहे.

Protected Content