चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चांभार्डी येथे चार कुटुंबियांच्या झोपड्यांना अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. संसार उघड्यावर आलेल्याने मदतीचा हात म्हणून मेडीकल असोशिएशनच्या वतीने संसारोपयोगी वस्तू देण्यात आले.
या घटनेत या कुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी झाली. पत्रकार व मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांनी त्यांना मदतीचा हात देण्याची संकल्पना आपल्या सहकारी मेडीकल व्यावसायिकांजवळ मांडली. त्याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर संघटनेचे अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव प्रेमसिंग राजपूत यांच्यासह संदीप बेदमुथा तसेच इतरांनी लगेचच काही रक्कम जमा केली. या रकमेतून संसारोपयोगी आवश्यक भांडी, डबे, चादरी, चटया यासारखे बरेचशे साहित्य विकत घेतले आणि सर्वांनी चांभार्डी येथे जाऊन चौघा पिडीत कुटुंबीयांच्या हवाली केले. शासनाकडून या कुटुंबीयांना मदत मिळेल की नाही, हे सांगता येणार नाही. मात्र, मेडीकल व्यावसायिकांनी या कुटुंबीयांना वस्तू रुपाने जी मदत केली, ती आजच्या परिस्थितीत त्यांना खूपच मोलाची ठरली आहे. मेडीकल असोशिएशनच्या दातृत्वाला सलाम.