चाळीसगाव प्रतिनिधी । टाळेबंदीत आघाडी सरकारने अव्वाच्या सव्वा बीलं पाठवून सर्वसामान्य वीजग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत आज भारतीय जनता पक्षातर्फे महावितरण कार्यालयाबाहेर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
महावितरणाने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावली आहे. राज्य शासनाच्या या जुलमी निर्णयाविरुद्ध भारतीय जनता पक्षाने टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन महावितरण कार्यालय चाळीसगाव येथे केले. ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे काम महावितरण कंपनीने केले आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या या कंपनीने सर्वसामान्य जनतेच्या वीज पुरवठा खंडित करू नये अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. याप्रसंगी किसानमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, जेष्ठ मार्गदर्शक चंद्रात्रे बाबा, प्रदेश पदाधिकारी उध्दवराव महाजन, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपील पाटील सर्व आजी माजी शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष,नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेवक, जि. प., पं. स. सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी,मंडल पदाधिकारी, आघाडी/मोर्चे पदाधिकारी,गट व गण प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/3816488198444359