चाळीसगाव नगराध्यक्षांना शिवीगाळ; नगरसेविका पतीवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । नगरपालिकेच्या सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत परवानगी न घेता गोंधळ घालून नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या नगरसेविका पती विरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव नगरपरिषदेच्या कार्यालयातील सभागृहात नगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी नितीन कापडणीस व त्यांचे अधिकारी यांची १४ मे रोजी दुपारी ४.३० वाजता महत्वाची बैठक चालू असतांना नगरसेविका सायली जाधव यांचे पती रोशन पांडूरंग जाधव रा. आंबेडकर चौक विना परवाना सभागृहात दरवाजा उघडून आत आला. सभागृहात आरडाओरड करून गोंधळ घालत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांना अश्लिल शिवीगाळ केली. “तूला पाहून घेईल” अशी धमकी दिली. याप्रकरणी नगराध्यक्षा यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी रोशन जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.

Protected Content