चाळीसगाव प्रतिनिधी । नगरपालिकेत फर्निचरचे बिल व डिपॉझिट काढून देण्याच्या मोबदल्यात ३ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या रोखपालास आज एसीबीने रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे चाळीसगाव नगरपरिषदकडे असलेले फर्निचरचे एक बिल काढून दिल्याचे मोबदल्यात व फर्निचरचे कामासाठी नगरपरिषदकडे जमा असलेली डिपॉजीट रकम परत मिळवून देण्याचे मोबदल्यात नगरपालिकेतील रोखपाल संदीप पंडितराव खैरनार, वय-52 रा.दत्तवाडी, दत्तमंदिर जवळ, चाळीसगाव १७ फेब्रुवारी रोजी ३ हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी ला.प्र.वि. नाशिक यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार आज २६ फेब्रुवारी रोजी रोखपाल हा ३ हजार रूपयांची रोख रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले असून त्याच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.