चाळीसगाव तालुक्यात कोवीशिल्ड लसीकरणास सुरुवात!

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात आज १६ जानेवारीपासून कोरोनावरील लस प्रथम ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक यांना ‘कोविशील्ड’ देऊन लसीकरणाला प्रारंभ करण्यात आली.

तालुक्यातील शासकीय ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात कोविशिल्ड लसीकरणाला सकाळी ११:३० वाजता सुरुवात करण्यात आली. यात प्रथम ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाविस्कर यांना लस देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील दुपारपर्यंत काही डॉक्टर व कर्मचारी असे एकूण २० जणांचे लसीकरण करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५० जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाविस्कर यांनी सांगितले आहे. तसेच लस सुरक्षित असून कोणीही घाबरून जाण्याचे काही एक कारण नसल्याचे बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content