चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका ह्या पार पडल्यानंतर 28 जानेवारी रोजी सिद्धिविनायक हॉल येथे सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. सरपंच आरक्षण सोडत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सताळकर,नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर झाले असून पुढील प्रमाणे आरक्षण सोडत करण्यात आली आहे. (सर्वसाधारण) – चांभार्डी बुद्रूक, जुनोने, डोण दिगर, पिंप्री बुद्रूक प्र. दे., खेडी खुर्द, चांभार्डी खुर्द, बिलाखेड, राजदेहरे, मुंदखेडे खुर्द, पाटणा, हिंगोणे खुर्द, गोरखपूर, पिंपरखेड, पिंप्री बुद्रूक प्र. दे., रांजणगाव इ .(सर्वसाधारण महिला) – भामरे बुद्रूक, भोरस बुद्रूक, बोढरे, तमगव्हाण, टाकळी प्र. चा., ओढरे, हातगाव, वरखेडे बुद्रूक, वाघळी, बोरखेडे खुर्द, भऊर, जामदा, कोदगाव, नांद्रे, मांदुर्णे, देशमुखवाडी, टेकवाडे खुर्द, बोरखेडे बुद्रूक, वडगाव लांबे, बाणगाव. (अनुसूचित जमाती) – देवळी, जामडी प्र. ब., रोहिणी, पिंपळगाव, कुंझर, तरवाडे, लोंढे. (अनुसूचित जमाती महिला) – खडकी बुद्रूक, तळोंदे प्र. दे., कळमडू, वाघडू, घोडेगाव, सायगाव, बेलदारवाडी. ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) – (ओबीसी- महिला)- ब्राह्मणशेवगे, दसेगाव, पळासरे, पिंपळवाड निकुंभ, चितेगाव, शिंदी, मुंदखेडे बुद्रूक, पोहरे, भवाळी, खडकीसीम, हातले, रोकडे. (नागरिकांचा मागासप्रवर्ग) -ओबीसी )- तळोंदे प्र. चा., वाघले, वाकडी, अलवाडी, तामसवाडी, शिरसगाव, बहाळ, धामणगाव, रहिपुरी. (अनुसूचित जाती) – तिरपोळे, दस्केबर्डी, टाकळी प्र. दे. (अनुसूचित जाती महिला) – पिंप्री खुर्द, खरजई, पिलखोड. या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.