चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यासाठी दहा कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील १२.६ किमी रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या कामांना मंजुरी मिळाली असून तसा शासन निर्णय देखील प्रसिद्ध झाला असून लवकरच निविदाप्रक्रिया होऊन कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली आहे. याच्या अंतर्गत कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर गाव व गणपूर तांडा, शामवाडी, ३२ नंबर तांडा, वलठाण व पाटणादेवी गावातील ग्रामस्थांना या रस्त्याचा फायदा होणार आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी या कामाला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, या कामासाठी भरघोस असा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.