चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुस्तीगीर संघाच्या तालुकाध्यक्षपदी रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अक्षय श्याम अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तालुकास्तरीय कुस्ती निवड चाचणी सामने पार पडले. यावेळी अग्रवाल यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
रघुवीर व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. नवोदित व नामांकित मल्लांसाठी खान्देशस्तरावर कुस्त्यांची दंगलही भरवली जाते. अग्रवाल यांचे आजोबा कै. भगवानदास अग्रवाल, कै. गोपाळदास अग्रवाल, कै. रमेशचंद्र अग्रवाल व वडिल कै. श्याम अग्रवाल हे कुस्तीचे आश्रयदाते म्हणून ओळखले जातात.
अग्रवाल यांच्या निवडीचे माजी आ. राजीव देशमुख, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल, संचालक योगेश अग्रवाल, राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य सुनील देशमुख, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य शांताराम हाडपे, माजी नगरसेवक आनंदा कोळी, पहिलवान सुभाष गायकवाड, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, बाबा पवार, वाघडू विकासोचे चेअरमन आबा पाटील, अजय देशमुख, प्रशांत पाटील, युवराज देशमुख गुलाबराव सोनवणे, विजय मराठे, मनोज शर्मा आदिंनी कौतुक केले आहे. चाळीसगावच्या मातीतील कुस्ती परंपरा अधिक पुढे घेऊन जाण्यासोबतच तिला ग्लॕमर मिळवून देण्यासाठी जोमाने प्रयत्न करु. अशी प्रतिक्रिया अक्षय अग्रवाल यांनी निवडीनंतर व्यक्त केली. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तांत्रिक समिती सदस्यपदी जितेंद्र शिवाजी राजपुत यांचीही निवड करण्यात आली.