चाळीसगावात विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा घेण्यात आला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा १३ नोव्हेंबर रोजी नानासाहेब य.ना. चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चाळीसगाव येथे भव्य प्रांगणात आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नालसा गिताने करण्यात आली त्यानंतर गुडशेफर्ड अॅकॅडमीचे विद्यार्थी व . तुषार मुजूमदार यांचे स्वागतगीताने झाली व पोलीस बॅंड, पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव यांचे पथकाने राष्ट्रगीत सादर केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एम.क्यु.एस.एम.शेख, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांचे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाले. सदर महामेळाव्यात तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, सामाजिक वनीकरण वन विभाग, तालुका क्रिडा मंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, तालुका कृषी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सहनिबंधक सहकार विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, उपअधिक्षक भुमी अभिलेख, सहा. आयुक्त समाजकल्याण, ग्रामीण रुग्णालय, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जळगाव, संरक्षण अधिकारी महिला बालकल्याण, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग, तालुका अभियान व्यवस्थापक, म.ग्रा.रो.ह.योजना, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत समाज कल्याण विभाग, एल.अाय.सी., महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, स्टेट बॅंक ऑफ इंडिया कृषी शाखा, आय.सी.आय.सी.आय. बॅंक, देवगिरी बॅंक, आशेचे द्वार प्रतिष्ठाण, जे.डी.सी.सी.बॅंक, रेल्वे विभाग, वन स्टाॅप सेंटर, भरोसा सेल, स्वयंदिप संस्था मिनाक्षीताई निकम, श्रमिक कार्ड धनंजय मांडोळे, आय.सी.आय.फाउडेंशन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी आपआपल्या विभागाची माहिती दिली व पत्रके वाटले. तसेच प्रत्येक स्टॉलवर जावुन मान्यवरांच्या हस्ते मंजुर प्रकरणातील लाभार्थ्यांना ओळखपत्र, दिव्यांग स्वावलंबन कार्ड, धनादेश, निधी वाटप, मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभाग चाळीसगाव यांनी एन.जी.ओ. मार्फत १००० रोपटयांचे वाटप करण्यात आले. सदर महामेळाव्यास चाळीसगाव तालुक्यातील सर्व खेडयातील ग्रामस्थ, महिला, दिव्यांग व तृतीय पंथी यांनी लाभ घेतला. सदर कार्यक्रमात श्री.एन.के.वाळके अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थितांना महामेळाव्याचा उद्देश सांगुन लाभ घेण्याचे आव्हान केले. सदर कार्यक्रमास प्रविण महाजन उपजिल्हाधिकारी जळगाव, श्री. बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव, रमेश चोपडे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चाळीसगाव, अॅड.केतन ढाके, अध्यक्ष जिल्हा वकील संघ तथा जिल्हा सरकारी अभियोक्ता जळगाव, उपविभागीय अधिकारी चाळीसगाव लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार चाळीसगाव .अमोल मोरे, .एस.डी.यादव, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव, श्रीमती. एस.आर. शिंदे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश चाळीसगाव, ए.एच.शेख, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर चाळीसगाव तसेच अॅड.भागवत के. पाटील, अध्यक्ष तालुका वकील संघ चाळीसगाव आणि वकील संघातील सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मा.श्री.ए.ए.के.शेख, सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण जळगाव यांनी उपस्थित मान्यवर व जनसमुदायाचे आणि यांनी या महामेळाव्याचे आयोजनास सहकार्य केले. त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड माधुरी बी.एडके, सचिव तालुका वकील संघ चाळीसगाव आणि .बी.जी.नाईक वरिष्ठ लिपीक, मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट जळगाव यांनी केले.

Protected Content