चाळीसगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने वारकरी संप्रदायांना पायी वारीला, भजन, कीर्तन, प्रवचन किर्तन सप्ताहास परवानगी द्यावी या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत अनोखे भजन आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

कोरोनाची दुसरी लाट ही ओसरलेली असताना आषाढी पायवारी झाली पाहिजे म्हणून प.पू. हभप बंडातात्या कराडकर यांनी पायीवारी जाण्याचा प्रयत्न केला असता. त्यांन पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीसारखे वागणूक दिली. त्यामुळे राज्य सरकारने वारकरी संप्रदायांना पायी वारीला, भजन, कीर्तन, प्रवचन किर्तन सप्ताहास व पपू हभप बंडातात्या कराडकर तथा वारकरी संप्रदायाचे जाहीर माफी मागावी आदी गोष्टींची परवानगी द्यावी. यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आज शनिवारी सकाळी भजन आंदोलन करून निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.
सदर आंदोलन हे चाळीसगाव मतदार संघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर निवेदनात शेकडो वर्षांची पायी वारीची परंपरा मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळात सुद्धा बाधित होती. परंतु कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा ही खंडित झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली म्हणून हॉटेल्स, स्मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ व सरकारी कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विना मास्कधारक फिरताना दिसून येत आहे. मात्र वारकऱ्यांचे उपासनेच्या मूलभूत अधिकारांवर गदा का? असा प्रश्नही वारकरींनी उपस्थित केला आहे. तसेच वारकरी यांनी काही सुचनाही केल्या आहेत. मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ५०० लोकांना वारी करण्याची परवानगी द्यावी, कोरोना चाचणी करून मगच परवानगी द्यावी, जेष्ठ सप्तमी ते एकादशी अशी २० दिवसांची वारी आम्ही १० दिवसांत पूर्ण करू तसेच ठिकठिकाणी वारेकरी बांधवांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, वारकरी संस्था अध्यक्ष कृष्णा पाटील, आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष ह.भ.प. दत्तात्रय महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, प्रखंड अध्यक्ष डॉ. सत्यजित पुर्णपात्रे, प्रखंड मंत्री विजय बाविस्कर, सहमंत्री ॲड. संजय नानकर, शहराध्यक्ष अविनाश चौधरी, ह.भ.प. सविता पाटील, संजय महाराज, ए.बी.पाटील, सुखदेव विक्राळ, सभापती संजय पाटील, विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री संदिप महाराज, रुपेश वाहाटे, कुणाल कुलकर्णी, सुरेश अहिरे, दिगंबर महाराज, रवींद्र पाटील, भजन सुभाष, जगताप, रवींद्र वाल्मीक महाराज, मनोज पाटील, बापू पाटील, दिलीप पाटील, समाधान ठाकरे, अविनाश कुलकर्णी, लीलाधर महाराज, पाटील पगार, रामभाऊ गायकवाड, सदाशिव पाटील, कैलास वाघ, बारकू पाटील, प्रकाश कुमार, संजय मांडोळे व मोठ्या संख्येने वारकरी बांधव उपस्थित होते.