Home Cities चाळीसगाव चाळीसगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खड्डेमुक्तीसाठी आंदोलन (व्हिडिओ)

चाळीसगावात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खड्डेमुक्तीसाठी आंदोलन (व्हिडिओ)

0
26


चाळीसगाव, जीवन चव्हाण । चाळीसगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली असून अनेकांना मनक्याचा आजार जडला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर हे खड्डे मुक्त झाले पाहिजे या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन करून नगरपालिकेचा निषेध करण्यात आला.

 

चाळीसगाव शहरात रस्त्यांची अक्षरशः  चाळणी झाली असून रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे.  या कंबरतोड रस्त्यामुळे अनेकांना मनक्याचा आजार जडू लागला आहे. खरजई नाका ते दयानंद हॉटेल दरम्यान गेल्या वर्षीच रस्ता करण्यात आला होता. परंतु, एकाच वर्षात रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. तसेच सिग्नल चौक ते तहसील कार्यालय पर्यंतचा रस्ता हा रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. चाळीसगाव शहर हे खड्डे मुक्त झाले पाहिजे या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. दरम्यान, खड्याभोवती रांगोळी काढून त्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध प्रकारच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. 

माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे  आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रा.काँ.तालुकाध्यक्ष  दिनेश पाटील, महिला तालुकाध्यक्ष  सोनल साळुंखे, शहराध्यक्ष श्याम देशमुख, नगरसेवक  भगवान पाटील, पं.स. सभापती अजय पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सदाशिव आप्पा गवळी, जगदीश चौधरी, रवींद्र गिरधर चौधरी, प्रदीप राजपूत, प्रशांत पाटील, शेखर देशमुख, हरीनाना जाधव, बाजीराव दौंड, परिघा आव्हाड, हेमांगी शर्मा, स्नेहल देशमुख, आर के माळीसर, खुशाल पाटील, भैय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील,  योगेश पाटील, मिलिंद शेलार, विजय शितोळे,  जिल्हा प्रवक्ते आकाश पाटील,  मोहित भोसले तालुकाध्यक्ष : रा.यु.काँग्रेस, शुभम पवार शहराध्यक्ष : रा.यु.काँग्रेस,  गौरव पाटील शहराध्यक्ष : रा.वि. काँग्रेस,  सुजित पाटील, विलास पाटील, राकेश राखुंडे, आव्हाड सर, दिनेश महाजन, भैय्यासाहेब महाजन,  सौरभ त्रिभुवन,  रिकी सोनार, गुंजन मोटे,  शरदसिंग राजपूत,  विनोद गवळी,  कौस्तुभ राजपूत, पंजाबराव देशमुख,  रफिक शेख, सुरज शर्मा, दीपक शिंदे,  कुंतेश पाटील, प्रतिक पाटील, विकास बोंडारे, निखील देशमुख, पप्पू राजपूत,  मंगेश वाबळे, कुलदीप निकम,  हृदय देशमुख, अतुल चौधरी,  शुभम गवळे,  घनश्याम जगताप, सिद्धार्थ देशमुख आदी उपस्थित होते.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/170263155138658


Protected Content

Play sound