चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील लकी कॉम्प्लेक्समध्ये किराणा दुकान फोडून काजू बदामसह रोकड असा एकुण ४१ हजार ९०० रूपयांची मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक अशोक पालखे (वय-३५) रा. नवागाव ता.चाळीसगाव यांचे चाळीसगाव शहरातील लकी कॉम्प्लेक्समध्ये सदगुरू किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ३९ हजार रूपयांची रोकड आणि ३ हजार रूपये किंमतीचे काजू व बदाम असा एकुण ४१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रकार काल शनिवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील करीत आहे.