चाळीसगाव, प्रतिनिधी | नववर्षाच्या औचित्य साधून हेमराज माधवराव पाटील (पिंटूदादा) यांच्या दातृत्वातून गरजू विद्यार्थ्यांना वह्या व मास्कचे वाटप येथील सानेगुरुजी विद्यालयात आज करण्यात आले.
चाळीसगाव येथील सानेगुरुजी प्राथमिक विद्यालयात आज नववर्षानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या व मास्कचे वाटप माधवराव पाटील (पिंटूदादा) यांच्या दातृत्वातून करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे हेमराज (पिंटूदादा) यांनी सांगितले.
यावेळी सर्व शिक्षक वृंद, राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव पाटील, युवक शहराध्यक्ष शुभम पवार, अजय पाटील, राहुल पाटील, विशाल चौधरी, पंजाबराव देशमुख व मित्र परिवार उपस्थित होते.