चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘दहावी व बारावी नंतर काय ?’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्था, जळगावच्या चाळीसगाव शाखेच्या वतीने आयोजित १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबिराप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमेश गठरी,भुरण घुले, प्रा. विश्वास देशपांडे, जितेंद्र गवळी, प्रकाश लंगोटे, प्रा. पंकज नंनवरे, शेणपडू औरंगे, किशोर झारखंडे आदी मंचावर उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मनोज काटकर, सचिव अक्षय औरंगे, खजिनदार शिवाजी औरंगे, सदस्य भावडू कडीखाऊ, लक्ष्मण निस्ताने,सोमनाथ निस्ताने, भावडू नामदे, रोहित गोंधळे, राहुल पिरणाईक, राजू यमगवळी, शिवाजी गोडळकर, प्रकाश जोमीवाळे, काशिनाथ औशिकर, लक्ष्मण आलनकर, सोमनाथ पिरणाईक, संतोष जाणगवळी, आकाश औशिकर, अनिल उदीकर आदी समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर झारखंडे यांनी केले. तर आभार संस्थेचे अध्यक्ष उमेश गठरी यांनी मानले.