चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्याची आमसभा तातडीने घ्यावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा येथील लोकनेते पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे.
लोकनेते पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठानतर्फे आज गटविकास अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी तालुक्याची आमसभा घेणे हे बंधनकारक आहे. तरी आपण गेल्या चार वर्षांपासून तालुक्याची एकही आमसभा घेतली नाही. आपण ग्राम सभेचे सचिव या नात्याने येणार्या आठ दिवसात आमसभा घ्यावी व मागील चार वर्षात आमसभा का घेतली नाही ? त्या संदर्भाचे स्पष्टीकरण आपण द्यावे जर येणार्या आठ दिवसात आपण आमसभा घेतली नाही किंवा टाळाटाळ केली. तर आम्ही आमसभा घेण्यासाठी लोकनेते पप्पुदादा गुंजाळ प्रतिष्ठाण मार्फत तालुक्यातील सर्वच संघटना, गावकरी, शेतकरी व बेरोजगार तरूणांना सोबत घेऊन तिव्र स्वरूपाचा जनमोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा यात देण्यात आला आहे.
हे निवेदन देतांना राहुल पाटील, सचिन फुलवारी, मनिष सैंदाने, सागर जाधव, पवन सैंदाने, हेमंत गुंजाळ, बंटी फुलवारी,रोशन चव्हाण, विनोद चव्हाण ,चेतन कुमावत आदी पदाधिकारी उपस्थित होते