Home क्राईम चाळीसगावातून बेपत्ता झालेला मुलगा सापडला; पोलीसांचे मानले आभार

चाळीसगावातून बेपत्ता झालेला मुलगा सापडला; पोलीसांचे मानले आभार


चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील अदित्य नगरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा दोन दिवसांपुर्वी काहीही न सांगत बेपत्ता झाला होता. बुधवारी शहरातील पवारवाडीतील सिनेमा हॉल परिसरात पोलीसांनी सापडला. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील आदीत्यनगर येथील योगेश छोटू कोळी (वय-१३) हा अल्पवयीन मुलगा भावासोबत मोबाईलवर खेळण्याच्या कारणावरून राग आल्याने घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला होता. यावेळी पालकांनी त्याचा शोध घेतला पंरतू आढळून आलेला नव्हता. या संदर्भात वडील छोटू तानाजी कोळी (वय-४१- रिक्षाचालक) यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी १ डिसेंबर रोजी शहरातील पवारवाडी परिसरात असलेल्या हंस सिनेमा हॉल परिसरात योगेश हा पायी जात असतांना पोलीसांना आढळून आला. त्याला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तर पालकांना बोलाविण्यात आले. यावेळी आण मोबाईल खेळण्याच्या रागातून कुणालाही काहीही न सांगता निघून गेलो होतो असे सांगितले. दरम्यान कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर अल्पवयीन मुलगा योगेश याला पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. मुलाला पाहून पालकांनी पोलीसांचे आभार मानले. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound