चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारत व रशिया सरकारच्या संयुक्त विद्यमाने माॕस्को व सेंट पीटर्सबर्ग येथे २४ ते २७ एप्रिल दरम्यान झालेल्या उद्योजक परिषदेत चाळीसगाव येथील युवा उद्योजक व आ.बं. मुलांच्या विद्यालयाचे चेअरमन योगेश अग्रवाल यांनी सहभाग घेतला. भारतातून रशियात शेतमालाची निर्यात वाढविल्यास शेतक-यांना मोठा फायदा होईल. असे मनोगतही अग्रवाल यांनी परिषदेत व्यक्त केले.
भारत व रशिया या दोन देशांमध्ये आयात – निर्यात वाढीस लागावी. शेतमालास चांगला भाव मिळावा. यासाठी ही परिषद घेण्यात आली. परिषदेत भारतील उद्योजक व भारत सरकारमधील काही अधिकारी असे मिळून ५० व्यक्ति सहभागी झाल्या होत्या. चार दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय उद्योजक विशेषतः योगेश अग्रवाल यांनी भारतातील शेतमालाची रशियात निर्यात व्हावी. हा मुद्दा ठळकपणे मांडला.
करारनामाही झाला
परिषदेला रशियातील भारताचे राजदूत पवन कपूर यांच्यासह रशियाच्या विदेश मंत्रालयाचे मंत्री सर्गे किरोमीन आदि उपस्थित होते. याच परिषदेत भारत – रशिया दरम्ययान आयात – निर्यात करारनामाही झाला. यासोबतच विविध मुद्यांवर चर्चाही झाली. योगेश अग्रवाल हे गेल्या काही वर्षापासून शेतमालाशी संबंधित उत्पादनांची विविध देशात निर्यात करण्याच्या उद्योगात अग्रेसर आहे.