जळगाव, प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवाशी व प्रगतशील शेतकरी गोपाळ महादू पाचपांडे (वय-८२) यांना आज सकाळी ८.०० वाजेदरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे देवाज्ञा झाली. तालुक्यातील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्यावर आज सायंकाळी ५.०० वाजेदरम्यान चारठाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ते वनाधिकारी (Forest Officer) कृष्णा (दिगंबर) पाचपांडे व राजेंद्र पाचपांडे यांचे वडील होत व डॉ. रघुनाथ पाचपांडे व अंकात पाचपांडे यांचे मोठे बंधू तसेच भूषण व योगेश यांचे ते आजोबा आणि मुक्ताईनगर येथील पाचपांडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. तुषार व प्रवीण पाचपांडे यांचे ते मोठेबाबा होते. अंबिलहोळ येथील रमेश तुळशिराम खर्चे यांचे व्याही होत.