चारचाकीच्या बोनेटवर बसून “तो” व्हीडिओ व्हायरल केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात चालचाकीच्या बोनेटवर बसून हा व्हिडिओ जळगावचा मन्या सुर्वे या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चार चाकी च्या बोनेटवर बसून भाईगिरी करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी रामानंदनगर पोलिसांनी कारवाई करत चांगलीच अद्दल घडवली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात बुधवार १७ मे रोजी रात्री ८ वाजता चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून फिरताना विठ्ठल भागवत पाटील रा. ज्ञानदेव नगर, अक्षय सपकाळे रा. खेडी आव्हाणे ता.जि.जळगाव, गौतम यशवंत पानपाटील रा. सावखेडा बुद्रुक ता.जि.जळगाव आणि देवेंद्र सोपान सपकाळे रा. खेडी आव्हाण ता.जि.जळगाव हे चार तरूणांनी मंगळवारी १६ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चारचाकीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओवर जळगावचा मन्या सुर्वे असा मजकूर लिहून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी विठ्ठल पाटील याला ताब्यात घेतले. याप्रकरणी बुधवारी १७ मे रोजी रात्री ८ वाजता पोलीस नाईक राजेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल भागवत पाटील रा. ज्ञानदेव नगर, अक्षय सपकाळे रा. खेडी आव्हाणे ता.जि.जळगाव, गौतम यशवंत पानपाटील रा. सावखेडा बुद्रुक ता.जि.जळगाव आणि देवेंद्र सोपान सपकाळे रा. खेडी आव्हाण ता.जि.जळगाव याच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Protected Content