देहरादून : वृत्तसंस्था । उत्तराखंडमधील चामोलीत हिमकडे वितळून झालेल्या हाहाकारानंतर मुरेंडा या ठिकाणी एक नैसर्गिक तलाव तयार झालाय. इंडो तिबेटीयन पोलिसांचं पथक या तलावाच्या ठिकाणी पोहचलंय. आयटीबीपीने या तलावाचा व्हिडीओ जारी केलाय.
जवानांनी या ठिकाणी छावणी तयार केलीय. हेलिपॅडचीही जागा निश्चित करण्यात आलीय. आयटीबीपीच्या जवानांनी या तलावाच्या प्रवाहात अडथळा ठरणारे लाकडं आणि इतर घाणही साफ केली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने उत्तराखंडच्या हिमालय परिसरात भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे.