जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या सबस्टेशनसमोर व्यापारी कार चालकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत पोलिसांनी अल्पवयीन मुलासह ६ संशयितांना अटक केली आहे. या संशयितांना सोमवार, २२ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अमित बद्रीप्रसाद अग्रवाल (रा. अजिंठा सोसायटी, जळगाव) हे २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एमआयडीसी एम सेक्टरमधील एमएसईबीच्या ऑफिससमोर आपली कारने जात असतांना दुचाकीने त्यांच्या कारला धडक दिली. दुचाकीवरील अनोळखी व्यक्तींनी अपघात झाल्याचा बनाव केला. त्यानंतर या लुटारूंनी अमित अग्रवाल आणि त्यांचे वडील बद्रीप्रसाद अग्रवाल यांना मारहान करुन व चाकुचा धाक दाखवून खिशातील दोन मोबाईल, HDFCकंपनीचे डेबिट कार्ड, पॅनकार्ड क्रमांक असे काढून घेतले. एवढेच नव्हे तर चालकाचा मोबाईल आणि कारमधील २ लाख ४९ हजार ८०० रुपयाची रोकड बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पोबरा केला. याप्रकरणी अमित अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा उमाळा व कुसूंबा येथील काही तरुणांनी केला असल्याची माहीती पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, मुकेश पाटील, दिपक चौधरी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे पोलीस चालक इम्तीयाज खान यांच्या पथकाने रात्रभरातच दिपक गजेंद्र मोहीते वय २८, प्रथमेश गंगाधर कोलते वय १९, शुभम ज्ञानेश्वर जाधव वय २२ तिन्ही रा. उमाळा ता. जळगाव, उमेश रमेश मोहीते, वय 22 , तेजस संतोष इंगळे वय २३ , कृष्णा रविंद्र पारधी वय २२, तिघे रा. कुसूंबा या सहा जणांना संशयितांना अटक केली. त्यांनी गुन्हयात वापरलेले होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक जि.जे. 05 के वाय 1197 हि जप्त करण्यात आली होती. यात आणखी अज्ञात 5 आरोपीतांचा शोध सुरु आहे.
अटकेतील सहा संशयिताना सोमवारी जिल्हा न्यायालयात न्यायमुर्ती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना २५ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे व पोलीस हेडकॉन्स्टेबल रतीलाल पवार करीत आहेत.